The Akola Urban Co-Operative Bank Ltd., Akola

The Akola Urban Co-Operative Bank Ltd., Akola We are a leading co operative bank in Maharashtra

07/08/2026

आजच आपल्या जवळच्या शाखेशी संपर्क साधा...

25/07/2026

आषाढी एकादशीनिमित्त अकोला अर्बन बँकेत विठ्ठल महापूजन संपन्न

अकोला, दि. २५ जुलै : आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त दि अकोला अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि., अकोला यांच्या प्रशासकीय कार्यालयात भक्तिमय वातावरणात भगवान श्री विठ्ठलाचे महापूजन संपन्न झाले.

बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजन सोनटक्के यांच्या हस्ते विधिवत महापूजन करण्यात आले. यावेळी बँकेचे माजी अध्यक्ष रामेश्वर फुंडकर, उपाध्यक्ष राहुल राठी, संचालक दिपक मायी, राहुल गोयनका, शार्दूल दिगंबर तसेच बँकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महापूजनानंतर आकर्षक श्री विठ्ठलाच्या मूर्तीचे दर्शन घेऊन सर्वांनी समाजात सुख, समृद्धी, आरोग्य आणि सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली. यानिमित्त प्रशासकीय कार्यालयात भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले.

63 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
11/07/2026

63 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

दि अकोला अर्बन बँकेची ६३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न0 भागधारकांच्या खात्यात ६.७५ टक्के लाभांश जमा 0 गुजरात...
10/07/2026

दि अकोला अर्बन बँकेची ६३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

0 भागधारकांच्या खात्यात ६.७५ टक्के लाभांश जमा

0 गुजरात राज्यात कार्यक्षेत्र विस्तारासही मंजुरी

अकोला, प्रतिनिधी : महाराष्ट्रातील अग्रगण्य मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक दि अकोला अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि., अकोलाची ६३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार, दि. १० जुलै २०२६ रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती, अकोला येथील गायवाडा शेतकरी भवन सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. सभेला मोठ्या संख्येने भागधारक उपस्थित होते. बँकेचे अध्यक्ष शंतनू जोशी यांच्या अध्यक्षतेखाली सभेच्या कामकाजास प्रारंभ झाला.

सभेच्या प्रारंभी अहवाल वर्षात दिवंगत झालेल्या देशातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, वैज्ञानिक, साहित्यिक, सहकार व आर्थिक क्षेत्रातील मान्यवर तसेच बँकेचे सभासद, ग्राहक, ठेवीदार, हितचिंतक आणि कर्मचारी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

प्रास्ताविकात अध्यक्ष शंतनू जोशी यांनी उपस्थित भागधारकांचे स्वागत करत बँकेच्या प्रगतीचा सविस्तर आढावा मांडला. त्यांनी सांगितले की, दि. ३१ मार्च २०२६ अखेर बँकेचे वसूल भागभांडवल ७१.७३ कोटी रुपये, राखीव व इतर निधी २२४.९६ कोटी रुपये, एकूण ठेवी १,८९८.३१ कोटी रुपये, कर्जवाटप १,१२३.६४ कोटी रुपये असून निव्वळ नफा १४.१० कोटी रुपये इतका झाला आहे. बँकेचे निव्वळ एनपीए केवळ ०.६१ टक्के राहिले असून, आर्थिक शिस्त आणि सक्षम व्यवस्थापनाचे हे द्योतक असल्याचे त्यांनी नमूद केले.

२०२५-२६ या आर्थिक वर्षाचा ६.७५ टक्के लाभांश भागधारकांना वितरित करण्यास सुरुवात झाल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच अहवाल वर्षात तीन नवीन शाखा सुरू करण्यात आल्या असून, संपूर्ण गुजरात राज्यात बँकेचे कार्यक्षेत्र विस्तारण्यासाठी रिझर्व्ह बँकेची मंजुरी प्राप्त झाल्याची महत्त्वपूर्ण माहितीही त्यांनी सभेस दिली.

बँकेच्या भक्कम आर्थिक स्थितीबद्दल सभेत समाधान व्यक्त करण्यात आले. या यशामागे भागधारक, ग्राहक, ठेवीदार, कर्मचारी आणि संचालक मंडळ यांचे मोलाचे सहकार्य असल्याचे सांगत, भविष्यातही असेच सहकार्य लाभेल, असा विश्वास अध्यक्षांनी व्यक्त केला.

यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी आर. एम. सोनटक्के यांनी दि. १८ जून २०२५ रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त सभेसमोर सादर केले. त्यास सभेने एकमताने मंजुरी दिली. त्यानंतर विषयसूचीतील विविध विषय उपाध्यक्ष राहुल राठी तसेच संचालक केदार खपली, धनंजय पाटील, किरण खोत, शार्दुल दिगंबर आणि राहुल गोयनका यांनी सभेसमोर मांडले. सर्व विषयांना उपस्थित भागधारकांनी एकमताने मंजुरी दिली.

सभेचे सूत्रसंचालन संचालक दीपक मायी यांनी केले, तर आभार प्रदर्शन संचालक माधव बनकर यांनी केले. यावेळी संचालक अमरिकसिंग वासरीकर, प्रमोद शिंदे, अजय गांधी, मोहन अभ्यंकर, कैलाशनाथ मशानकर, संगीता गांधी, सीमा डिक्कर, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे सदस्य भूषण काळे, सुभाष गोरे, प्रसाद देशपांडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राधेश्याम चिराणिया, कर्मचारी प्रतिनिधी पंजाब अव्हाळे, वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उत्साही, खेळीमेळीच्या आणि सकारात्मक वातावरणात बँकेची ६३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा यशस्वीरीत्या संपन्न झाली.

21/06/2026

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

अकोला, दि. २१ जून : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त दि. अकोला अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, भारतीय योग संस्थान व सहकार भारती अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित योग शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. बँकेच्या प्रशासकीय कार्यालय परिसरात आयोजित या कार्यक्रमात अधिकारी, कर्मचारी, योगसाधक तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व मान्यवरांच्या उपस्थितीत झाली. यावेळी योगतज्ज्ञांनी विविध योगासने, प्राणायाम व ध्यानधारणा यांचे प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले. सहभागी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे योगसाधना करून आरोग्यदायी जीवनशैलीचा संकल्प केला.

याप्रसंगी सहकार भारती, अकोला चे अध्यक्ष रामेश्वर फुंडकर यांनी योगाचे शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक महत्त्व विशद केले. नियमित योगाभ्यासामुळे तणावमुक्त जीवन, सकारात्मक विचारसरणी आणि उत्तम आरोग्य लाभते, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमात योगाचे विविध लाभ अधोरेखित करण्यात आले. "योग करा – निरोगी राहूया, आनंदी राहूया" हा संदेश देत सर्वांना दैनंदिन जीवनात योगाचा अंगीकार करण्याचे आवाहन करण्यात आले. तर आभार बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजन सोनटक्के यांनी मानले. या प्रसंगी बँकेचे संचालक दीपक मायी, धनंजय पाटील, राहुल गोयनका उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी दि. अकोला अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

आजच आपल्या जवळच्या शाखेशी संपर्क साधा.
12/05/2026

आजच आपल्या जवळच्या शाखेशी संपर्क साधा.

जलसंधारण दिन
10/05/2026

जलसंधारण दिन

मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
10/05/2026

मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

विनम्र अभिवादन
09/05/2026

विनम्र अभिवादन

Address

Jankalyan, 58-59, Toshniwal Layout, Near Govt. Milk Scheme, Murtizapur Road
Akola
444001

Alerts

Be the first to know and let us send you an email when The Akola Urban Co-Operative Bank Ltd., Akola posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share