25/01/2023
यशस्वी गुंतवणूक हे उत्तम वित्तीय वर्तनाचे अंग : कुलकर्णी
मुंबई : यशस्वी गुंतवणूक हे उत्तम वित्तीय वर्तनाचे
अंग असते, असे मत अथर्व इन्व्हेस्टमेंटचे तुषार कुलकर्णी
यांनी व्यक्त केले.
मल्टी-अॅसेट फंडच्या श्रेणीत अॅसेट वितरणाच्या रणनीतीचे
अनुसरण केले जाते. मल्टी-अॅसेट फंड हे मूलतः उपाय
आधारित आर्थिक उत्पादन असते. गुंतवणुकीच्या दृष्टीने
संतुलित दृष्टीकोन ठेवण्यासाठी अशा योजनेत तीन किंवा
अधिक वेगवेगळ्या मालमत्तांमध्ये गुंतवणूक करण्या येते.
'सेबी'च्या योजना श्रेणी आदेशानुसार, अशा योजनेमध्ये कोणत्याही
वेळी तीन किंवा अधिक अॅसेट क्लासमध्ये प्रत्येकी किमान १० टक्के
गुंतवणूक करण्यात येते. प्रत्यक्षात, एखाद्या मल्टी-ॲसेट योजनेत एका
पोर्टफोलिओमध्ये इक्विटी, डेब्ट आणि सोन्यामध्ये गुंतवणूक असलेल्या
तीनपेक्षा जास्त अॅसेट क्लासचे मिश्रण असते असे सांगून कुलकर्णी
म्हणाले, ॲसेट क्लासव्यतिरिक्त, एखादी मल्टी-अॅसेट योजना इन्फ्रास्ट्रक्क
र इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट आणि रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्टमध्येही गुंतवणूक
करू शकते. आपल्या वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओमध्ये, मल्टी-
अॅसेट फंड सामान्यतः ६५ ते ७५ टक्के इक्विटीमध्ये, २० ते
२५ टक्के डेब्टमध्ये वाटप करतात आणि उरलेल्या भागाला
सोने आणि इतर गुंतवणूक पर्यायांमध्ये स्थान मिळते, हे
लक्षात घेतले पाहिजे.
ही योजना अॅसेटशी संबंधित जोखमींचे व्यवस्थापन
करून दीर्घकालीन परतावा देण्याचा प्रयत्न करते. यामुळे
गुंतवणूकदारांना सर्व मालमत्ता वर्गांचे कमाल लाभ
मिळण्यास मदत होते, तसेच अॅसेट वितरणाशी संबंधित समस्या दूर
राहतात. तसेच, त्यामुळे गुंतवणुकीची शिस्त कायम राहण्यास मदत होते
आणि गुंतवणूकदारांनी भावनावश होऊन घेतल्या निर्णयांचा परिणाम
पोर्टफोलिओवर होत नाही. मार्केट कॅपिटलायझेशन, विविध क्षेत्रे आणि
मालमत्तांमध्ये गुंतवणूक करण्यातील या फंडाची लवचिकता लक्षात
घेता, गुंतवणूकदारांना दीर्घकालीन शाश्वत संपत्ती निर्मिती देण्याकरिता
हा फंड सज्ज आहे असेही कुलकर्णी यांनी सांगितले.