Breaking Maharashtra ब्रेकिंग महाराष्ट्र

  • Home
  • India
  • Solapur
  • Breaking Maharashtra ब्रेकिंग महाराष्ट्र

Breaking Maharashtra ब्रेकिंग महाराष्ट्र “ब्रेकिंग महाराष्ट्र — महाराष्ट्रातील ताज्या बातम्या, राजकारण, सामाजिक, अर्थकारण आणि महत्वाच्या घडामोडी सर्वात आधी तुमच्यापर्यंत. Follow करा आणि अपडेट राहा!”

एकनाथ खडसे यांचे भावनिक वक्तव्य
31/08/2026

एकनाथ खडसे यांचे भावनिक वक्तव्य

बंडू जाधव याने आयुष्यातील सर्वात मोठी चूक केली आहे, संजय शिरसाट आणि एकनाथ शिंदेंचं ऐकून. बंडू जाधवचं अस्तित्त्व मराठ्यां...
30/08/2026

बंडू जाधव याने आयुष्यातील सर्वात मोठी चूक केली आहे, संजय शिरसाट आणि एकनाथ शिंदेंचं ऐकून. बंडू जाधवचं अस्तित्त्व मराठ्यांनी उभं केलंय, हे तो विसरला. त्याला सांगितलं होतं कार्यक्रम रद्द कर, त्याने केला नाही, ही त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक आहे. कार्यक्रम घेणं अस्तित्व नव्हतं तुझं, मराठा समाजाला सांभाळणं हे तुझं अस्तित्वं होतं. पण आता तुझ्या राजकारणाला अवकळा लागली समज. - मनोज जरांगे-पाटील, मराठा आंदोलक



(Manoj Jarange Patil, Sanjay Jadhav, Eknath Shinde, Maharashtra)

मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणासाठी ये-जा करणाऱ्या वाहनांना टोल माफ करा  #बीड: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्षयोद्धा मन...
29/08/2026

मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणासाठी ये-जा करणाऱ्या
वाहनांना टोल माफ करा
#बीड: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या वतीने २९ ऑगस्ट २०२६ पासून अंतरवाली सराटी (ता. अंबड, जि. जालना) येथे पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून लाखो मराठा बांधव, नागरिक व समर्थक मोठ्या संख्येने अंतरवाली सराटीच्या दिशेने येत आहेत. या प्रवासादरम्यान आंदोलक आणि नागरिकांना वेगवेगळ्या टोलनाक्यांवर मोठा आर्थिक भार सहन करावा लागत आहे. ही बाब अत्यंत गंभीर असल्याने, उपोषणस्थळी येणाऱ्या व तेथून परत जाणाऱ्या सर्व वाहनांना तात्काळ टोलमाफी देण्यात यावी, असे पत्र खा. #बजरंग #सोनवणे यांनी यंत्रणेला दिले आहे.



मनोजदादांच्या मागण्या योग्य असून त्यांनी आम्हाला समर्थन दिलं होतं म्हणून आमचं त्यांच्या आंदोलनाला समर्थन आहे.- अभिजीत दी...
29/08/2026

मनोजदादांच्या मागण्या योग्य असून त्यांनी आम्हाला समर्थन दिलं होतं म्हणून आमचं त्यांच्या आंदोलनाला समर्थन आहे.

- अभिजीत दीपके CJP प्रमुख

मुंबईला जायची तारीख ठरली: मनोज जरांगे पाटील यांची मोठी घोषणा12 तारखेपर्यंत मागण्या मंजुर करा. जर मागण्या मंजुर नाही केल्...
29/08/2026

मुंबईला जायची तारीख ठरली: मनोज जरांगे पाटील यांची मोठी घोषणा

12 तारखेपर्यंत मागण्या मंजुर करा. जर मागण्या मंजुर नाही केल्या तर आम्ही मुंबईला धडकणार

आज सुरू केलेले आमरण १२ तारखेपर्यंत सुरूच राहणार. तोवर निर्णय झाला नाही तर मुंबईला जाण्याची १२ तारखेला तयारी करणार. हे आमरण उपोषण कितीही दिवस चालले तरी मागण्या मान्य नाही झाल्या तर हे उपोषण सोडणार नाही. सरकारकडे आणखी 15 दिवस वेळ आहे. 12 तारखेला जी तारिख ठरेल त्या दिवशी मुंबईला निघायचे. महिलांनी मुंबईला यायचे नाही. म्हातारे माणसेदेखील सुरूवातीलाच मुंबईला निघायचे. मुंबईच्या मराठ्यांनी जेवणाची व्यवस्था करा. रस्ते दाखवा. हे आंदोलन 12 टप्प्यात होणार आहे. आरपारची लढाई लढायची आता. सर्वांनी तयार रहा.

"यूपीमध्ये १४० कोटी देशाचे पोट भरण्याची क्षमता!" मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे मोठे विधान 🚨उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री...
27/08/2026

"यूपीमध्ये १४० कोटी देशाचे पोट भरण्याची क्षमता!" मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे मोठे विधान 🚨

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्याच्या कृषी आणि उत्पादन क्षमतेवर मोठा विश्वास व्यक्त केला आहे. "उत्तर प्रदेशात केवळ २५ कोटी जनतेचेच नव्हे, तर संपूर्ण देशातील १४० कोटी लोकसंख्येचे पोट भरण्याची क्षमता आहे. तसेच राज्यात साखरेचा कोणताही तुटवडा नाही," असा दावा त्यांनी केला आहे.

योगी आदित्यनाथ यांच्या या विधानावर आणि दाव्यावर तुमचे काय मत आहे? कमेंट करून नक्की सांगा. 👇

पूल आणि जलविद्युत प्रकल्प काड्यांप्रमाणे वाहून गेले; जीव वाचवण्यासाठी पळणाऱ्या लोकांना महापुराने गिळंकृत केले — नेपाळमधी...
26/08/2026

पूल आणि जलविद्युत प्रकल्प काड्यांप्रमाणे वाहून गेले; जीव वाचवण्यासाठी पळणाऱ्या लोकांना महापुराने गिळंकृत केले — नेपाळमधील या भीषण संकटाची हृदयद्रावक दृश्ये.

नेपाळवर निसर्गाचा कोप झाला आहे. तिबेटच्या सीमेवरून आलेला अचानक आणि प्रचंड पूर तसेच वेगाने वाढणाऱ्या पाणी पातळीमुळे देशातील अनेक भागांत हाहाकार उडाला आहे. दुथडी भरून वाहणाऱ्या नद्यांच्या रौद्र प्रवाहाने क्षणार्धात समृद्ध परिसराचे ढिगाऱ्यात रूपांतर केले. या जलप्रलयामध्ये अनेक जलविद्युत प्रकल्प पूर्णपणे वाहून गेले, रस्ते व पूल कोसळले आणि शेकडो वाहने पाण्याखाली गेली.

या अचानक आलेल्या महापुरामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे; अनेक लोक बेपत्ता असल्याचे वृत्त असून मोठ्या प्रमाणावर बचावकार्य सुरू आहे. तिबेटमधून नेपाळमध्ये आलेल्या या पुरामुळे निर्माण झालेली विध्वंसाची भयावह दृश्ये या छायाचित्रांमधून पहा...

शाळेच्या गणवेशासोबत हिजाब घालण्याची परवानगी मागणाऱ्या मुस्लिम विद्यार्थिनीची याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयाने फेटाळली. इ...
26/08/2026

शाळेच्या गणवेशासोबत हिजाब घालण्याची परवानगी मागणाऱ्या मुस्लिम विद्यार्थिनीची याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयाने फेटाळली. इस्लाम धर्मात हिजाब अनिवार्य असल्याचा उल्लेख नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. त्यावर खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
-

नेपाळमध्ये महापुराचा कहर; १,००० हून अधिक नागरिक बेपत्ता, १०० हून अधिक भारतीय नॉट रिचेबलनेपाळमध्ये आलेल्या भीषण महापुरामु...
26/08/2026

नेपाळमध्ये महापुराचा कहर; १,००० हून अधिक नागरिक बेपत्ता, १०० हून अधिक भारतीय नॉट रिचेबल

नेपाळमध्ये आलेल्या भीषण महापुरामुळे परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. तिबेटमधील भूकंपानंतर हिमस्खलन किंवा ग्लेशियर लेक फुटल्यामुळे अचानक मोठ्या प्रमाणात पाणी खाली आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या महापुराचा सर्वाधिक फटका रसुवा जिल्ह्याला बसला असून, त्रिशुली नदीच्या पाण्याच्या प्रचंड वेगामुळे अनेक घरे, पूल, रस्ते आणि जलविद्युत प्रकल्पांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक भागांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला असून हेलिपॅड पाण्याखाली गेल्याने बचावकार्यातही अडथळे निर्माण झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, १,००० हून अधिक नागरिक बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये १०० हून अधिक भारतीय नागरिक नॉट रिचेबल असल्याने भारतातील त्यांच्या कुटुंबीयांची चिंता वाढली आहे.

दरम्यान, पुराचा धोका बिहारपर्यंत पोहोचण्याची शक्यता असल्याने बिहारमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. नेपाळमध्ये बचाव आणि मदतकार्य सुरू असून प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.

⚠️ नेपाळमधील परिस्थिती अत्यंत गंभीर; नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे.

26/08/2026

80-90 लाख मराठे मुंबई मध्ये आंदोलनासाठी येणार - श्री मनोज जरांगे पाटील

Address

Patil Plot , Shivajinagar Barshi Dist Solapur
Solapur
413411

Telephone

+919423526187

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Breaking Maharashtra ब्रेकिंग महाराष्ट्र posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share