व्यापारी महासंघ, उमरगा

व्यापारी महासंघ, उमरगा Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from व्यापारी महासंघ, उमरगा, Omerga, Osmanabad.

**उमरगा शहराचा अभिमान: उद्योगपती मा. श्री सिद्रामप्पा चिंचोळे यांच्या उत्तुंग कार्याचा सन्मान!**मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड ...
26/07/2026

**उमरगा शहराचा अभिमान: उद्योगपती मा. श्री सिद्रामप्पा चिंचोळे यांच्या उत्तुंग कार्याचा सन्मान!**

मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड अँड कॉमर्सच्या २९ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित भव्य सोहळ्यात धाराशिव जिल्ह्यातून उमरगा येथील ख्यातनाम उद्योगपती **मा. श्री सिद्रामप्पा चिंचोळे** यांना व्यापार आणि सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल ‘गौरव पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार केवळ त्यांचा वैयक्तिक सन्मान नसून, संपूर्ण उमरगा शहराच्या आणि लिंगायत समाजाच्या शिरपेचात रोवलेला एक सुवर्णकलश आहे.

उद्योग क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करताना सिद्रामप्पा चिंचोळे यांनी नेहमीच सचोटी, मेहनत आणि नैतिकतेला प्राधान्य दिले. उमरगा व्यापारी महासंघाचे माजी अध्यक्ष म्हणून त्यांनी व्यापाऱ्यांचे प्रश्न अत्यंत कौशल्याने आणि धैर्याने सोडवले. व्यापाऱ्यांमधील एकजूट मजबूत करणे, त्यांच्या अडचणीत पाठीशी खंबीरपणे उभे राहणे आणि स्थानिक व्यापाराला चालना देणे यात त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे राहिले आहे.

व्यापारासोबतच सामाजिक भान जपणे ही त्यांची खरी ओळख आहे. उमरगा नगर परिषदेचे माजी नगरसेवक म्हणून त्यांनी शहराच् विकासात्मक कार्य केलं . तसेच, उमरगा लिंगायत समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि ‘बसवरत्न पुरस्कार सोहळा नियोजन समिती’चे ज्येष्ठ सल्लागार म्हणून अशा सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक उपक्रमांना त्यांनी कायम दिशा दाखवली आहे.

मा. श्री सिद्रामप्पा चिंचोळे यांना मिळालेला हा गौरव पुरस्कार त्यांच्या बहुआयामी नेतृत्वाचा आणि अविरत समाजसेवेचा यथोचित सन्मान आहे. त्यांच्या या उत्तुंग यशामुळे उमरगा शहराची मान अभिमानाने उंचावली आहे. त्यांना या सन्मानाबद्दल मनःपूर्वक हार्दिक अभिष्टचिंतन! ईश्वर त्यांना उत्तम आरोग्य, उदंड आयुष्य आणि भविष्यातील सर्व कार्यात भरभरून यश प्रदान करो, हीच सदिच्छा! 💐💐

23/07/2026
सप्रेम नमस्कार,          गोवर्धन गोशाळा त्रिकोळी येथे वाढत्या गायींच्या संख्यांमुळे बरीच विकासकामे करण्याची गरज आहे. आम्...
29/10/2025

सप्रेम नमस्कार,
गोवर्धन गोशाळा त्रिकोळी येथे वाढत्या गायींच्या संख्यांमुळे बरीच विकासकामे करण्याची गरज आहे. आम्ही गोशाळेच्या विकासाकरिता निधी उपलब्ध व्हावा या हेतूने आकारनिर्मित "कृष्ण रंग" हा सुप्रसिद्ध भजन संध्या चॅरिटी शो करत आहोत. प्रति रसिक रु.1000/- प्रमाणे तिकीट आहे. संकलित झालेला निधी गोमातेच्या संवर्धनासाठी वापरण्यात येणार आहे.
कृष्ण रंग हा अंगावर शहारे आणणारा भक्तिमय कार्यक्रम असून त्यात 35 महिला एकत्र एकालयात भजन आणि गवळणी नृत्य वाद्यवृंदासह सादर करतात ज्यात रसिक तल्लीन होऊन जातात. हा देशभरात सुप्रसिद्ध असा कार्यक्रम आहे, ज्याचा धाराशिव, लातूर व सोलापूर या जिल्ह्यात प्रथमच प्रयोग असेल.
उमरगा शहरात धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन धर्म व संस्कृती जपावी हाही उद्देश साध्य होतो हा या मागील मानस आहे. तरी सदर कार्यक्रमास सहपरिवार येऊन गोमातेच्या संवर्धनास हातभार लावावा ही नम्र विनंती.
तिकीट साठी संपर्क क्र:
8668477757
8530366299

29/10/2025

आकारनिर्मित
*"कृष्ण रंग"*
भजन संध्या चॅरिटी शो

*दिनांक : ०३/११/२०२५ सोमवार.*
*वेळ : दुपारी ४.०० वा.*
*स्थळ : चिंचोळे मंगल कार्यालय, उमरगा*

प्रजासत्ताक दिन 26 जानेवरी 2024
27/01/2024

प्रजासत्ताक दिन 26 जानेवरी 2024

उमरगा : उमरगा शहरात रिक्षाचालकांचा वाढता त्रास, शहरातील प्रमुख महामार्गवर होणाऱ्या अतिक्रमण यावर लवकरात लवकर लक्ष घालून ...
13/01/2024

उमरगा : उमरगा शहरात रिक्षाचालकांचा वाढता त्रास, शहरातील प्रमुख महामार्गवर होणाऱ्या अतिक्रमण यावर लवकरात लवकर लक्ष घालून त्यांना एक पार्किंग पॉईंट करून त्या ठिकाणी आपले वाहन थांबवण्यास सांगावे या मागणीचे निवेदन पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले .

बाजारपेठेत ये जा करतांना मुख्य मार्गावरून अंतर्गत येणाऱ्या रस्त्यालगत तीन चाकी ऑटोरिक्षा अर्ध्या रस्त्यात उभारहून ग्राहकांची वाट पाहतात यामुळे बाजारपेठेत येण्यासाठी नागरिकांना, महिलांना नाहक त्रास होतो. त्यांना कोणी रिक्षा काढण्यासाठी सांगितले असता लागलीच तक्रार करण्यास सुरुवात करून अरेरावेची भाषा वापरली जाते. यासाठी अशा रिक्षाचालकांवर लवकरात लवकर कारवाई करून व त्यांना त्यांना एक पार्किंग ठिकाणी उभरण्यास सांगावे असे निवेदन व्यापारी महासंघाच्या वतीने देण्यात आले.
एैन संक्रान्त सणासुदीला असा बाजारपेठेत ग्राहकांची चहल पहल वाढली आहे, त्यात असा रिक्षाचालकांचा त्रास व रस्त्यालागत उभा असलेल्या वाहनाचा त्रास यामुळे बाजारपेठेत होणाऱ्या ग्राहकांवर परिणाम होत आहे. अशा प्रकारचे संभाधित विभागाला यापूर्वी ही निवेदन व तोंडी चर्चा करून सुद्धा यावर कारवाई होत नाही. याची दाखल पोलीस प्रशासनाने घ्यावी
- शिवप्रसाद लड्डा
सचिव व्यापारी महासंघ, उमरगा*IBN मुख्य रस्त्यावर बेशिस्त रिक्षाचालकांचा बंदोबस्त करावा,पार्किंग पॉईंट करण्याची मागणी*

https://indiabuzzon.com/?p=26245

 #चंद्रयान_3  चंद्रावर यशस्वी उतरल्या बद्दल उमरगा व्यापारी महासंघातर्फे श्री गणेश मंदिरात आरती करुण व छत्रपती शिवाजी महा...
23/08/2023

#चंद्रयान_3 चंद्रावर यशस्वी उतरल्या बद्दल उमरगा व्यापारी महासंघातर्फे श्री गणेश मंदिरात आरती करुण व छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास हार आर्पन करुण तसेच फटाके वाजवुन जल्लोश करण्यात आला. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभापती व व्यापारी महासंघाचे अध्यक्ष रणधिर पवार, व्या.महासंघाचे मा.अध्यक्ष सिद्रामप्पा चिंचोळे ,कार्याध्यक्ष नितिन होळे,उपाध्यक्ष मनेष माणिकवार,फयुम पठाण, शिवसेनेचे तालुका प्रमुख बाबुराव शहापुरे,पप्पु स्वामी,लक्ष्मण शिंदे, जाफर कारचे,महादेव वरकले, इरफान पटेल,विनायक माने, तम्मा दंडगे,सुधाकर सुकणे,मधुकर गुरव,पंकज पवार,रामलिंग स्वामी,बाबुराव आरबळे राम बोधे.व ईतर

Address

Omerga
Osmanabad
413606

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when व्यापारी महासंघ, उमरगा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share