Sindhudurg DCC Bank

Sindhudurg DCC Bank The Sindhudurg District Central Co-Operative Bank Ltd., Sindhudurg

28/08/2026

*सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ६७ लिपीक पदांच्या भरती प्रक्रियेस प्रारंभ.*

*इच्छुक व पात्र उमेदवारांनी वेळेत अर्ज सादर करून या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा: मनीष दळवी*
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ६७ लिपीक पदांच्या भरती प्रक्रियेस प्रारंभ होत असुन इच्छुक व पात्र उमेदवारांनी वेळेत अर्ज सादर करून या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा,असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी केले आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., च्या वतीने यापूर्वी आयबीपीएस (IBPS) या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेमार्फत लिपीक पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. सदर भरती प्रक्रियेतील निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश देऊन त्यांची नियुक्ती प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आलेली आहे. बँकेस नव्याने मंजूर झालेल्या ६७ लिपीक पदांच्या भरतीसाठी आता देशातील अग्रगण्य व मान्यताप्राप्त संस्था टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) यांच्यामार्फत नवीन भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
या संदर्भात बँक व टीसीएस यांच्यात अधिकृत करार करण्यात आला असून, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) यांच्याकडून कळविण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार *दिनांक ३ सप्टेंबर, २०२६ पासून* उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज *दि. १७ सप्टेंबर, २०२६ पर्यंत* स्विकारले जातील. तसेच सदरची परीक्षा *दि. १८ ऑक्टोबर, २०२६* च्या दरम्याने होणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
टीसीएस ही भारतातील विश्वासार्ह व प्रतिष्ठित संस्था असून, विविध बँका, वित्तीय संस्था, शासकीय विभाग तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांच्या भरती परीक्षा यशस्वीपणे आयोजित करण्याचा त्यांना व्यापक अनुभव आहे. सदर भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक, गुणवत्ताधिष्ठीत व संघणकीकृत पद्धतीने राबविण्यात येणार आहे. भरती प्रक्रियेत इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन अर्ज सादर करावा लागणार असून, त्यानंतर टीसीएसमार्फत संगणकाधारीत (Online) परीक्षा घेण्यात येईल. परीक्षेतील गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांची निवड करून बँकेतील मंजूर ६७ लिपीक पदे भरली जाणार आहेत.
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही जिल्ह्यातील अग्रगण्य सहकारी वित्तीय संस्था असून, ग्राहकाभिमुख सेवा व आधुनिक बँकिंग सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. वाढत्या व्यवसायाचा विस्तार, ग्राहक सेवेत अधिक परिणामकारकता आणि शाखांच्या कामकाजातील कार्यक्षमता वाढविण्याच्या उद्देशाने ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

भरती प्रक्रिये संदर्भातील सविस्तर जाहिरात, पात्रता, वयोर्मादा, अर्ज शुल्क, परीक्षा पद्धती, अभ्यासक्रम व इतर अटी-शर्ती याबाबतची माहिती बँकेच्या *www.sindhudurgdcc.bank.in* या अधिकृत संकेतस्थळावर (वेबसाईट) लवकरच उपलब्ध होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी दिनांक १ सप्टेंबर, २०२६ नंतर बँकेची अधिकृत वेबसाईट नियमितपणे तपासत रहावे. जेणेकरून भरती प्रक्रियेसंदर्भातील सर्व अद्ययावत सूचना, जाहिरात व अर्ज प्रक्रियेची माहिती वेळेत प्राप्त होईल.
इच्छुक व पात्र उमेदवारांनी वेळेत अर्ज सादर करून या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी केले आहे.

प्रेम, विश्वास आणि जिव्हाळ्याचा सुंदर सण म्हणजे रक्षाबंधन. या पवित्र बंधनामुळे प्रत्येक नातं अधिक दृढ होवो आणि सर्वांच्य...
28/08/2026

प्रेम, विश्वास आणि जिव्हाळ्याचा सुंदर सण म्हणजे रक्षाबंधन. या पवित्र बंधनामुळे प्रत्येक नातं अधिक दृढ होवो आणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख व समृद्धी नांदो, हीच शुभेच्छा.

#2026

नारळी पौर्णिमेच्या शुभप्रसंगी सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि भरभराट नांदो. हा सण आनंद आणि नवचैतन्य घेऊन येवो.     ...
27/08/2026

नारळी पौर्णिमेच्या शुभप्रसंगी सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि भरभराट नांदो. हा सण आनंद आणि नवचैतन्य घेऊन येवो.

#2026

सिंधुदुर्गातील ग्रामीण सहकाराला नव्या दिशेची गरज : सतीश मराठेसिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहकार क्षेत्र अधिक सक्षम, गतिमान आणि...
24/08/2026

सिंधुदुर्गातील ग्रामीण सहकाराला नव्या दिशेची गरज : सतीश मराठे
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहकार क्षेत्र अधिक सक्षम, गतिमान आणि स्वावलंबी करण्यासाठी ग्रामीण भागातील सहकारी संस्था, PACS आणि ग्रामीण बँकांनी नव्या संधींचा स्वीकार करून कामाचा विस्तार करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक सतीश मराठे यांनी केले.
सहकार भारती सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संयुक्त विद्यमाने बाळशास्त्री जांभेकर पत्रकार भवन, ओरोस येथे आयोजित ‘ग्रामीण सहकार संवाद’ कार्यक्रमात ते बोलत होते.
भारताची अर्थव्यवस्था वेगाने प्रगती करत असून, जागतिक संकटांनंतरही देशाची आर्थिक क्षमता मजबूत आहे. डिजिटल पेमेंट, बँकिंग सेवा आणि विविध सामाजिक सुरक्षा योजनांमुळे सामान्य नागरिक मोठ्या प्रमाणात आर्थिक प्रवाहात आला आहे. गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर नवीन बँक खाती उघडली गेली असून, ग्रामीण अर्थव्यवस्थेला याचा मोठा फायदा होत असल्याचे मराठे यांनी नमूद केले.
“ग्रामीण भागाच्या विकासासाठी PACS आणि सहकारी संस्था सक्षम करणे, तसेच नव्या संस्था उभारणे आवश्यक आहे,” असे त्यांनी सांगितले. शेती, मत्स्यव्यवसाय, काजू, दुग्धव्यवसाय, पर्यटन आणि ग्रामीण उद्योगांना सहकाराच्या माध्यमातून नवी गती देता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
नव्याने स्थापन झालेल्या ‘त्रिभुवन’ सहकारी युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून ५० हून अधिक अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आले असून, शॉर्ट टर्म सर्टिफिकेटपासून पदवीपर्यंतच्या शिक्षणाच्या संधी निर्माण झाल्या आहेत. सरकार, सहकारी संस्था आणि सामाजिक संस्था यांनी एकत्रितपणे काम केल्यास ग्रामीण बँकांचा देशाच्या विकासातील वाटा आणखी वाढू शकतो, असे मराठे म्हणाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष श्री. मनीष दळवी होते. उपाध्यक्ष श्री. अतुल काळसेकर, महाराष्ट्र राज्य काजू महामंडळाचे संचालक तथा सहकार भारती कोकण विभाग प्रमुख धनंजय यादव, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनिरुद्ध देसाई, सहकार भारती सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष श्री. अमित आवटे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
यावेळी जिल्ह्यातील सहकारी संस्थांसमोरील समस्या, नव्या संधी, संस्थांचे सक्षमीकरण आणि बदलत्या आर्थिक परिस्थितीतील आव्हानांवर सखोल चर्चा झाली. शेतकरी, मच्छीमार, काजू उत्पादक, सहकारी संस्थांचे पदाधिकारी आणि युवा उद्योजक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न!सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्मचारी व कुटुंबीयांचा...
24/08/2026

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न!
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्मचारी व कुटुंबीयांचा स्नेहमेळावा शरद भवन, ओरोस येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व नाबार्डचे संचालक मा. श्री. सतीश मराठे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.
यावेळी बँकेच्या मागील पाच वर्षांतील कामकाजाचा आढावा घेणाऱ्या पुस्तिकेचे प्रकाशन मा. सतीश मराठे यांच्या हस्ते करण्यात आले. मार्गदर्शन करताना त्यांनी भारतातील बदलती आर्थिक परिस्थिती, बँकिंग क्षेत्राची वाढ, डिजिटल व्यवहार आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या औपचारिकीकरणावर प्रकाश टाकला. सहकारी संस्थांनी सभासदांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
अध्यक्ष मनीष दळवी यांनी बँकेच्या प्रगतीचा आढावा घेताना कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या योगदानाचे कौतुक केले. आधुनिक CBS प्रणाली, वैयक्तिक ग्राहकांपर्यंत पोहोच आणि व्यवस्थापन खर्चात झालेली घट यामुळे बँकेने उल्लेखनीय प्रगती साधल्याचे त्यांनी सांगितले.
उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनीही कर्मचाऱ्यांच्या कार्यतत्परतेचे विशेष कौतुक केले. लॉकडाऊनच्या काळातही बँकेचा व्यवसाय वाढला आणि ग्राहकांचा विश्वास कायम राहिला, यामागे कर्मचाऱ्यांची मेहनत असल्याचे त्यांनी नमूद केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई यांनी प्रास्ताविकातून बँकेच्या प्रगतीचा आढावा घेत भविष्यातही बँकेला प्रगतीपथावर नेण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शरद सावंत यांनी केले.
यावेळी बँकेचे पदाधिकारी, संचालक, अधिकारी-कर्मचारी तसेच त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली.

तुमच्या बचतीत अधिक वाढ करण्यासाठी धनवर्धिनी ठेव योजना हा उत्तम पर्याय आहे. सुरक्षित गुंतवणूक आणि आकर्षक परताव्यासाठी आजच...
24/08/2026

तुमच्या बचतीत अधिक वाढ करण्यासाठी धनवर्धिनी ठेव योजना हा उत्तम पर्याय आहे.
सुरक्षित गुंतवणूक आणि आकर्षक परताव्यासाठी आजच आपल्या शाखेशी संपर्क साधा.
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची धनवर्धिनी ठेव योजना...

#2026

तुमच्या बचतीत अधिक वाढ करण्यासाठी धनवर्धिनी ठेव योजना हा उत्तम पर्याय आहे. सुरक्षित गुंतवणूक आणि आकर्षक परताव्यासाठी आजच...
22/08/2026

तुमच्या बचतीत अधिक वाढ करण्यासाठी धनवर्धिनी ठेव योजना हा उत्तम पर्याय आहे. सुरक्षित गुंतवणूक आणि आकर्षक परताव्यासाठी आजच आपल्या शाखेशी संपर्क साधा.

#2026

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा तुळसुली कार्यक्षेत्रातील घावनळे गावात ग्रामपंचायत घावनळे यांच्या सभागृहात आर...
20/08/2026

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा तुळसुली कार्यक्षेत्रातील घावनळे गावात ग्रामपंचायत घावनळे यांच्या सभागृहात आर्थिक व डिजिटल साक्षरता या विषयाच्या अनुषंगाने ग्राहक मेळावा आयोजित करण्यात आला सदर मेळाव्या प्रसंगी भारतीय रिझर्व बॅंकेच्या जिल्हा समन्वयक मा.श्रीमती बेनझीर शेख व नाबार्डच्या जिल्हाप्रबंधक मा. दिपाली माळी मॅडम जिल्हा अग्रणी बँकेचे महाप्रबंधक श्री.ऋषिकेश गावडे तसेच सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री.गावडे साहेब, उमेद चे प्रतिनिधी श्री.गणेश राठोड व बहुसंख्य महिला खातेदार उपस्थित होते सदर कार्यक्रमा वेळी जिल्हा बँकेचे उपमुख्य कार्यकारी श्री.गावडे साहेब यांनी बँकेच्या विविध ठेव योजना तसेच कर्ज योजनांची माहिती दिली तसेच नाबार्डच्या डीडीएम माळी मॅडम यांनी पंतप्रधान जीवन ज्योती व जीवन सुरक्षा विमा तसेच अटल पेन्शन योजना या संदर्भात मार्गदर्शन केले तसेच बँकेच्या विविध डिजिटल प्लॅटफॉर्म संदर्भात माहिती दिली रिझर्व बँकेच्या शेख मॅडम यांनी सध्या होणारे डिजिटल अपहार व त्याबाबत उपाययोजना याबाबत उपस्थितांना सविस्तर माहिती दिली सदर कार्यक्रमा वेळी घावनळे ग्रामपंचायत सरपंच सौ.आरती वारंग व उपसरपंच दिनेश वारंग उपस्थित होते बँकेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून ग्राहकांनी या सर्व योजनांचा लाभ घ्यावा व डिजिटल अपहारा संदर्भात जागृत राहून डिजिटल अपहार टाळण्यासाठी भारतीय रिझर्व बँकेने राबवित असलेल्या मोहिमेबाबत आभार व्यक्त केले.
camp #2026

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या नेरूर शाखेचा नूतन वास्तूत स्थलांतर सोहळा  दि. १९ -०८ -२०२६ रोजी शाखा कार्यालयाचा स्थलांतर सोह...
20/08/2026

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या नेरूर शाखेचा नूतन वास्तूत स्थलांतर सोहळा दि. १९ -०८ -२०२६ रोजी शाखा कार्यालयाचा स्थलांतर सोहळा आमदार निलेश राणे यांच्या हस्ते उत्साहात पार पडला.
यावेळी आमदार निलेश राणे यांनी गेल्या पाच वर्षांत जिल्हा बँकेने केलेल्या उल्लेखनीय प्रगतीचे कौतुक करत अध्यक्ष मनीष दळवी यांच्या कार्याचे विशेष अभिनंदन केले. “राणे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली बँकेला कुठेही डाग लागू न देता प्रगतीपथावर नेण्यात आले आहे. बँकेला लावलेली शिस्त आज नफ्याच्या रूपात दिसून येत आहे,” असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
ग्राहक आणि सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेत जिल्हा बँक उत्तम कामगिरी करत असल्याचे सांगत, ग्राहकांना अधिकाधिक दर्जेदार सेवा देण्यासाठी संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी यांनी प्रयत्नशील राहावे, असे आवाहनही आमदार राणे यांनी केले.
दरम्यान, “सामान्य शेतकरी आणि ग्राहकांपर्यंत बँक पोहोचली पाहिजे. बँकेत आल्यानंतर ग्राहकाला समाधान मिळाले पाहिजे,” हा आमचा प्रयत्न असल्याचे जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी सांगितले. आपल्या कार्यकाळात बँकेने ८,००० कोटी रुपयांचा व्यवसाय पूर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.
ग्राहकांनी दाखवलेल्या विश्वासाला आणि दिलेल्या साथीला योग्य सुविधा देणे ही आपली बांधिलकी असल्याचे सांगत, आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघातील ज्या शाखांचे उद्घाटन झाले, त्या शाखांनीही प्रगती केली असल्याचे मनीष दळवी यांनी स्पष्ट केले.
नेरूर देऊळवाडा येथील बापू सडवेलकर यांच्या इमारतीत ही नूतन शाखा स्थलांतरित करण्यात आली आहे. यावेळी जागा मालक बापू सडवेलकर यांचा बँकेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, सर्वश्री संचालक आत्माराम ओटवणेकर, प्रकाश मोर्ये , विद्याप्रसाद बांदेकर, सौ. नीता राणे, संदीप परब, व्हीक्टर डान्टस, रवींद्र मडगावकर, केशव नारकर, सरपंच सौ. भक्ती घाडीगावकर, सरपंच सौ. स्वाती करलकर, सरपंच राजेश प्रभू, मंगेश बांदेकर, सुनील नाईक, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, शाखा व्यवस्थापक सौ. युगा पेडणेकर यांच्यासह बँकेचे अधिकारी, कर्मचारी, ग्राहक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

#2026

बँकेच्या अधिकृत कॉलिंग क्रमांकांची माहिती ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी आणि योग्य माहिती मिळण्यासाठी बँकेकडून वापरल्या जाण...
20/08/2026

बँकेच्या अधिकृत कॉलिंग क्रमांकांची माहिती

ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी आणि योग्य माहिती मिळण्यासाठी बँकेकडून वापरल्या जाणाऱ्या अधिकृत क्रमांकांची नोंद ठेवा.

मार्केटिंग व प्रमोशनल कॉल्स:
1409345238
बँकेच्या योजना, नवीन उत्पादने, ऑफर्स व प्रमोशनल संदेशांसाठी.

सर्व्हिस व कर्जविषयक कॉल्स:
1600312838
कर्जवसुलीशी संबंधित संवाद, थकीत रक्कम, परतफेडीचे पर्याय व आवश्यक मार्गदर्शनासाठी. हे कॉल AI तसेच Diller मार्फत केले जाऊ शकतात.

#2026

Address

Maharashtra , Malvan, India , India , Savantvadi, India , Devgad
Kudal
416812

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sindhudurg DCC Bank posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Sindhudurg DCC Bank:

Shortcuts

Share

Category