AgriUtopia

AgriUtopia There is limitation to connect farmers at individual level and count of farmers approaching to us is increasing day by day. Join us for Non toxic revolution.

Introduction of Company-

Our team is working in farming sector from 2006 and consulting farmers for better agricultural practices.We teach farmers how to reduce the effort and cost of farming and generate income in different ways and to make biological inputs to detoxify agriculture. Agri Utopia is established in 2022 to build channel and connect as many farmers as possible. Now we provide consu

ltation and training to farmers for organic farming. Also we provide Organic fertilizer to increase production output from farm.

Mission-
Our mission is to give this soil to next generation of nation in the condition that they can cultivate food from soil and agriculture should be natural, sustainable and profitable without disrupting the bio-chain.

Vision-
Our vision is to connect every farmer of nation and convince him to use organic fertilizers for his own financial up-liftment and for healthy nation.

Who We Are-

Farmer want to produce organic food because he know the importance of healthy food and healthy life. Many times farmer produce organic food for own use because he believe that the production output will decrease in case of using organic fertilizer. Farmer do not get better compensation for his organic product. Here our work is start,
We consult farmer and give him training. We provide organic fertilizer which will increase output of product by 25-30%. We want to up lift rural economy by increasing production from farm at the same time by saving soil. Natural farming is not capable to feed nation of 140 crore population and chemical fertilizer is damaging soil and health of nation. So the best farming practices will be organic farming. Here our primary goal is to save soil because we can not manufacture artificial soil in factory. This is very high time that we should do something to save soil. Our next generation will have every luxurious things but they do not have fertile soil to produce food. The consequences will be horrible if we can not produce food by soil. Our secondary goal is to make healthy nation. We are having poison for our lunch and dinner. The patients of cancer, dialysis, diabetic, blood pressure are increasing in society and the reason is our food. We want that every individual deserve healthy food and we are working hard to supply it.

'कृषी चिकित्सालय' चे संस्थापक आणि ' Agri Utopia pvt Ltd' चे डायरेक्ट श्री अभिजित दीक्षित यांचे आज नैसर्गिक शेती विषयीचे ...
12/12/2023

'कृषी चिकित्सालय' चे संस्थापक आणि ' Agri Utopia pvt Ltd' चे डायरेक्ट श्री अभिजित दीक्षित यांचे आज नैसर्गिक शेती विषयीचे मार्गदर्शन जरूर ऐका.

03/10/2023
03/10/2023

Post-003
Non-toxic farming revolution

मातीला पर्याय काय असेल...?

शेकडो वर्षांनी पृथ्वीवर उल्का येऊन आपटणार, बर्फ वितळून समुद्राची पाण्याची पातळी वाढणार वगैरे वगैरे अनेक कारणे पृथ्वी किंवा पृथ्वीवरची मानवी प्रजात नष्ट होण्याची आपण ऐकतो. आपण हे रिल्स/पोस्ट गांभीर्याने घेत नाही आणि घेऊ पण नये. आपल्याला दैनंदिन जीवनातील समस्या आणि जगण्याचे संघर्ष एवढे आहेत की आपण अस्तित्वात नसताना होणाऱ्या गोष्टींचा किंवा त्रासाचा विचार आत्ता करणे गरजेचे नाही.

पण आपल्या विनाशाचे खरे कारण आपल्यापर्यंत आलेले नाही. आपण जिवंत असताना आपण कोणत्या गोष्टीचा त्रास ह्याची देही ह्याची डोळा बघणार आहे तर तो म्हणजे आपल्या जमीनी नापीक होण्याचा.

आपल्याकडे जास्तीत जास्त चाळीस वर्षे आहेत जोपर्यंत आपल्याला मातीमधून काहीतरी मिळेल, ते खाण्यायोग्य असेल की नाही हा वेगळा मुद्दा आहे. दुर्दैवाने जर तुम्ही मिडल क्लास असाल किंवा समोरच्याकडून हिसकावून घेण्याचे मानसिक व शारीरिक ताकद नसेल तर आपल्याकडे पंधरा वर्षे आहेत. हि वर्ष कमीजास्त का आहेत हे सविस्तर काल्पनिक कथांमधून लिहिले आहे, जे खरे होऊ नये अशी इच्छा आहे.
डिझर्टिफिकेशन ही प्रोसेस काही वर्षांपासून सुरू आहे. आता जवळपास ३३% जमीन नापीक झाली आहे. दहा सेंटिमीटर सुपीक माती तयार होण्यासाठी दोन हजार वर्षे कालावधी लागतो. त्यामुळे डिमांड सप्लाय जवळपास पण नाही आहे.

माती हि एक नॉन रिन्यूएबल नैसर्गिक स्त्रोत आहे. ती एक जिवंत गोष्ट आहे आणि स्वतःहून मरत नाही. आपण तिला मारून टाकत आहे. ती कोणत्याही फॅक्टरीमध्ये तयार होत नाही. जेव्हा माती नापीक होईल तेव्हा आपल्या मूलभूत गरजांपैकी एक 'अन्न' ह्या गोष्टीसाठी आपल्याकडे प्लॅन बी काही आहे काय??
- ओंकार कामत
7387349075

02/10/2023

Post-002
Non-toxic farming revolution
गेले दोन वर्ष एक गोष्ट खूप ठिकाणी निदर्शनास आली. बरेच शेतकरी त्यांच्या शेतात स्वतःसाठी लागणाऱ्या गोष्टी वेगळ्या पिकवतात आणि बाजारात विकण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी वेगळ्या पिकवतात. यामागे त्यांची कारणे वेगवेगळी आहेत, ती बरोबर आहेत की नाही हे माहिती नाही पण त्यांना चूक म्हणता येणार नाही. हे असं का करता असं त्यांना विचारल्यास त्यांचे उत्तर असं होतं की, 'हे असलं विष आपल्या लेकरा बाळांना खायला घालायचं काय?'...
एका गावांमध्ये तर ऐरणीच्या देवाचा साक्षात्कार झाला. केमिकल खते विकणाऱ्या विक्रेता एका सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्याकडून घरी लागणारा भाजीपाला घेत होता. त्यांना विचारलं असता त्यांचे उत्तर होते की, 'हा व्यवसाय आहे. पण कुटुंब म्हणून काही जबाबदारी आहे की नाही. सगळं माहिती असून परत तेच खायचं होय'.
आता कुटुंब म्हणून त्यांची जबाबदारी आहे, तशी आपली पण आहे. ज्यांची शेती नाही, शेतीशी काही संबंध नाही, जवळच्या मंडईमध्ये जाऊन खरेदी करणे याशिवाय कोणताही पर्याय नाही, अशी लोके विषमुक्त अन्न डिझर्व करत नाहीत का??
मला असं वाटतं, प्रत्येक जातीचा, धर्माचा, पक्षाचा;
अगदी पैशाने गरीब असलेला गरीब, पैशाने गरीब असलेला श्रीमंत, पैशाने श्रीमंत असलेला गरीब, पैशाने श्रीमंत असलेला श्रीमंत सर्वजण विषमुक्त अन्न डिझर्व करतात.
मग डिझर्व करतात तर ते देणार कोण..
हरितक्रांती ह्यावर सविस्तर गप्पा होतील पण त्यावेळी आपण एक वेळ मारून जायचे म्हणून पुढे गेलो. 'लोक उपाशी मरण्यापेक्षा आजारी पडून मेलेली बरी' हा प्रकार सुरु झाला पण थांबला नाही आणि आता वेळ निघून गेली. अराजकीय पोस्ट आहे म्हणून कुणावरही टीका नाही. पण कोणतेही सरकार यावरती काहीही करू शकत नाही. कारणे खूप व्यापक आहेत, रिस्क खूप मोठी आहे आणि श्रीलंकेचे उदाहरण समोर आहे.
जे काही करायचे आहे, ते तुम्हाला मला आणि आपल्याला करायचे आहे.
आपण करू शकतो...
(जेव्हा मुद्दा व्हॅलिड वाटेल आणि जे काही करत आहे त्यामागील उद्दिष्ट व हेतू प्रामाणिक आहे असे वाटेल तेव्हा संपर्क करा...... सोबत पुढे जाऊ)
- ओंकार कामत
7387349075

01/10/2023

Post-001
Non-toxic farming revolution
बऱ्याच वर्षांपूर्वी फेसबुक वरती छंद म्हणून लिहायचो. त्यानंतर खूपवेळा सगळ्यांसमोर येण्याची इच्छा होत होती पण समोर येण्यासाठी कारण आणि विषय मिळत नव्हते. इच्छा असणे आणि एखादा बोलण्यासाठी महत्त्वाचा विषय असणे यामध्ये खूप फरक आहे. इच्छाधारी लेखन एकतर्फी प्रेमासारखे आहे.
दोन वर्षांपूर्वी लिहिण्यासाठी कारण आणि विषय दोन्ही मिळाले. माझा उद्योजक म्हणून संघर्षाचा काळ सुरू असताना एका वळणावरती शेती क्षेत्रासंदर्भात काही व्यक्तींची भेट झाली. बाकी प्रवासवर्णन आता सांगत नाही. सुरुवातीला एक व्यवसायाची संधी म्हणून या गोष्टीकडे बघून अभ्यास सुरू केला. जसे वाचत गेलो तसे एक एक भयानक वास्तव समोर आले. दुःख अश्या गोष्टीचे झाले की एक सुशिक्षित सुज्ञ नागरिक म्हणून मी आणि माझ्या जवळचे खूप लोक यापासून अनभिज्ञ होते पण आनंद ह्या गोष्टीचा होता की पहिला सोल्युशन कळाले आणि अभ्यास केल्यावरती प्रॉब्लेम समोर दिसला. फेसबुक वरती सोलुशन नसलेल्या समस्या हायलाईट करणाऱ्या कॅटेगरी मधून मी केव्हाच बाहेर आलो होतो.
समाजामध्ये आपल्यासमोर सुरू असलेल्या बऱ्याच गोष्टींचे बरेच कोलॅटरल डॅमेजेस आहेत. पण शेती या क्षेत्रामध्ये सुरु असलेल्या गोष्टींचे कोलॅटरल डॅमेजेस फार भयानक आहेत आणि यामध्ये मुद्दाम जर सर्वसामान्य माणसाला डॅमेज करणे हे उद्दिष्ट असेल तर ते खूपच भयानक असेल. हे वाक्य पूर्ण विचार करून लिहिले आहे आणि पुढे सविस्तर लिहिणार आहे.
आज बाराशे पेक्षा जास्त व्हाट्सअप ग्रुप आणि पाच चैनल मधून आम्ही खूप शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलो आहे. एक वेगळा सुशिक्षित आणि कदाचित हतबल वर्ग ह्यापासून अनभिज्ञ आहे, त्यांच्यापर्यंत पोहोचणे हे इथे येण्यामागचे उद्दिष्ट आहे.
'रासायनिक शेती हानिकारक आहे म्हणून सेंद्रियकडे वळण्यापेक्षा सेंद्रिय शेतीतून गुणवत्ता,उत्पादन व नफा जास्त मिळत असेल तर रासायनिक शेती का करायची' इथे मुद्दा सुरू होऊन 'GM सीड' पर्यंत संपेल.
यामध्ये बरेच काही बोलण्यासारखे आहे .
(जेव्हा मुद्दा व्हॅलिड वाटेल आणि जे काही करत आहे त्यामागील उद्दिष्ट व हेतू प्रामाणिक आहे असे वाटेल तेव्हा संपर्क करा...... सोबत पुढे जाऊ)
- ओंकार कामत
7387349075

Address

Gokul Shirgaon MIDC
Kolhapur
416234

Alerts

Be the first to know and let us send you an email when AgriUtopia posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to AgriUtopia:

Share