23/08/2026
भुलेश्वरमध्ये गणेशमूर्ती कोसळल्याचा व्हिडिओ समोर आला!
गणेश आगमनावेळी संपूर्ण मूर्ती कोसळून मोठी दुर्घटना झाली. या घटनेत संकेत नेवशे आणि बृजेश हेमंत जोशी यांचा मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले. मूर्ती भायखळ्याहून भुलेश्वरला आणली जात असताना हा अपघात झाला.
मृतांची नावे
संकेत नेवशे, वय ३३ वर्षे — ‘भुलेश्वरचा राजा’ गणेश मंडळाचे अध्यक्ष असल्याचे सांगितले जात आहे.
बृजेश हेमंत जोशी, वय ३० वर्षे — या दुर्घटनेत त्यांचाही मृत्यू झाला.
दोघांना रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
जखमींची नावे
जखमींमध्ये दोन लहान मुलांचाही समावेश आहे:
वैभव घेणंद — वय ३८ वर्षे
पवन चौरसिया — वय २५ वर्षे
कुणाल काशीद — वय २६ वर्षे
लावण्या गनेर — वय ५ वर्षे
दिव्या गनेर — वय ७ वर्षे
मिळालेल्या माहितीनुसार, सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.