30/04/2026
"आपल्या महाराष्ट्राची ओळख केवळ इतिहासात नाही,
तर ती प्रत्येक कष्टकरी हातात, प्रत्येक घामाच्या थेंबात जिवंत आहे…
शेतात राबणारा शेतकरी असो, कारखान्यात मेहनत करणारा कामगार असो,
किंवा आपल्या कलेने, उद्योगाने राज्य घडवणारा प्रत्येक नागरिक—
यांच्याच कष्टातून उभा राहिला आहे आपला अभिमानाचा महाराष्ट्र.
हीच मेहनत, हीच जिद्द आणि हीच परंपरा आपल्याला पुढे घेऊन जाते…
महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या सर्वांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!"